घड्याळाचं बटन दाबाल तरच तुमच्याकडे लक्ष देऊ- अजित पवार

December 25, 2016 6:42 PM0 commentsViews:

ajit_pawar--621x414

25 डिसेंबर : घड्याळाचं बटन दाबाल तरच तुमच्याकडे लक्ष देऊ.फक्त काम करायला मी कोणी साधु-संत नाही,असं धक्कादायक विधान केलंय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी.आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन पिंपरी-चिंचवडमधील विकास कामांचं उदघाटन करण्याचा धडाका अजित पवार यांनी लावलाय.

गेल्या आठवड्यापासून अजित पवारांनी विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याचा धडाका लावलाय.शहरातील 50पेक्षा जास्त विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन अजित पवार करतायत.तसंच हा विकास केवळ राष्ट्रवादीनं केल्याचं सांगत.या पुढेही तुम्हाला घड्याळाचंच बटन दाबावं लागेल तरच आम्ही उरलेले प्रश्न सोडवू असा धमकीवजा इशारा अजित पवारांनी दिलांय.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या आधीदेखील अजित पवार अडचणीत होते आणि पुन्हा अशा प्रकारचं विधान करून अजित पवार यांनी मतदारांचा अनदार केल्याचं बोललं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close