झोपड्या तोडण्याचे आदेशच नव्हते

May 18, 2010 1:30 PM0 commentsViews: 5

18 मे

मानखुर्दमधील अण्णा भाऊ साठे नगर मधील 500 झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. पण या झोपड्या तोडण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढलेच नव्हते, अशी माहिती आता उघड झाली आहे.सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी हा आरोप केला आहे.

मानखुर्दमधील एका सोप कंपनीच्या जागेवरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. मास डिमॉलिशनचे नव्हे, असे त्यांनी सांगितले.

तसेच हिरानंदानी यांनी केलेल्या अतिक्रमणाला राज्य सरकार करमाफी देते, मग गरीब झोपडपट्टी धारकांवरच कारवाई का? असा सवालही त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामधील आणि सरकारमधील मंत्री-आमदार स्वत:ची घरे बनवत आहेत. तेव्हा मुख्यमंत्री काही करत नाहीत, मग झोपडपट्‌ट्यांवरच बुलडोझर का चालवले जात आहेत? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

close