‘दंगल’ची बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची दंगल

December 26, 2016 12:00 PM0 commentsViews:

dangal_640x480_41482486198

26 डिसेंबर: आमिर खानच्या दंगल या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरही दंगल सुरूच आहे. तीन दिवसांमध्ये या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 106 कोटी 95 लाख रूपयांचा गल्ला वसूल केलाय. 23 डिसेंबर रोजी ख्रिसमस विकेण्ड डोळ्यासमोर ठेवून रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी 29 कोटी 78 लाखांचा बिझनेस केला.

सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात असलेली उत्सुकता आणि आमिर खानने केलेलं आगळं वेगळं प्रमोशन याच्या जोरावर या सिनेमाला बंपर ओपनिंग मिळालं. देशभरातील 4000 हून अधिक स्क्रिन्सवर रिलीज झालेल्या दंगलला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळालाय. महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुलींच्या आयुष्यावरील या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारूड केलंय.

नोटबंदीच्या काळात सिंगल स्क्रिन आणि मल्टीप्लेक्स दोन्हींच्या व्यवसायाला मोठा फटका बसलेला असताना दंगलने त्यांना मोठा हात दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close