पत्नीसोबत सेल्फी काढून रेल्वेखाली आत्महत्या

December 26, 2016 11:40 AM0 commentsViews:

WhatsApp Image 2016-12-25 at 9.39.45 PM

26 डिसेंबर : मध्य रेल्वेच्या वाशिंद आणि खडवली स्थानकांदरम्यान साने-पाली गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडलीय. खर्डी विभागातील टेंभा गावात राहणारा विशाल रमेश खाडे या युवकाने भरधाव येणाऱ्या गाडीखाली आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं.

आत्महत्येपूर्वी त्याने रेल्वे ट्रॅक मध्ये आपली पत्नी वैष्णवी सोबत एक सेल्फी काढला. या सेल्फी सोबत त्याने एक सुसाईड नोटही टाईप केली. ही सुसाईड नोट त्याने आपले मित्र व नातेवाईक, भाऊ, यांना वॉट्सअप द्वारे सेंट केली, या सुसाईट नोटमध्ये सचिन वेखंडे नामक व्यक्तीकडून वॉट्स अॅपद्वारे येणाऱ्या धमक्या,आणि शिवीगाळीला कंटाळून मी आणि माझी पत्नी आत्महत्या करत असल्याचे त्यानं लिहिलं.

मात्र प्रत्यक्षात रेल्वे ट्रॅक मध्ये उभं असतांना विशालने पत्नी वैष्णवी हिला ट्रॅकच्या बाहेर ढकलून दिलं आणि स्वत: मात्र आपलं जीवन संपवलं. विशालला 6 महिन्यांची दुर्वा ही एक मुलगी आहे. या घटनेमुळे कोवळ्या वयात दुर्वा पोरकी झालीये.

शुल्लक कारणावरून कर्त्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे विशालचे आईवडीलही हेलावून गेलेत. या घटनेनंतर कल्याण लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close