खंडणीसाठी 16 वर्षांच्या मुलांनी केला चिमुरडीचा खून

December 26, 2016 11:59 AM0 commentsViews:

MUMBAI GIRL KILLED

26 डिसेंबर : तुम्ही अनुराग कश्यपचा ‘अग्ली’ सिनेमा पाहिला असेल तर त्याची आठवण करून देणारी घटना मुंबईतल्या नागपाड्यात घडलीय. 1 कोटीच्या खंडणीसाठी एका चिमुरडीचं शेजारीच रहाणाऱ्या 16 वर्षाच्या दोन मुलांनी अपह्रण केलं आणि ते फसलंय असं दिसताच तिची मोबाईलच्या वायरनं गळा आवळून हत्या केली.

नागपाडा पोलीसांनी चिमुरडीचा शोध सगळीकडे घेतला आणि 20 दिवसानंतर त्याच चिमुरडीचा मृतदेह शेजारी इमारतीच्या छतावर छिन्नविछीन्न अवस्थेत मिळाला. जुनेरा मुमताज खान असं चिमुरडीचं नाव असून तिचे वडील स्क्रॅप डीलर आहेत.

चिमुरडी इतकी गोड होती की सगळी गल्ली तिच्याशी खेळायची. तिच्या वडीलांची श्रीमंती बघून शेजारचे दोन किशोरवयीन मुलं वासिम आणि जावेदनं तिचं अपह्रण केलं आणि खंडणीची मागणी केली. चिमुरडी खूपच रडायला लागली त्यावेळेस तिला शांत करण्यासाठी दोघांनी क्लोरोफॉर्म तिच्या नाकाला लावला. त्यात तिच्या नाकातून रक्त येतंय असं दिसताच तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर मग वेगवेगळ्या सिमवरून ते तिच्या वडिलांना खंडणीची मागणी करत राहिले.

दोन्ही किशोरवयीन आरोपी हे सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी असून ते हुशार मानले जातात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close