एसपीएस त्यागींना अखेर जामीन मंजूर

December 26, 2016 12:23 PM0 commentsViews:

Augusta-Westland-Scam-SP-Tyagi-580x395

26 डिसेंबर : ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटकेत असलेले माजी वायुदलप्रमुख एसपीएस त्यागींना अखेर जामीन मंजूर झालाय. हेलिकॉप्टरच्या निविदेत गरजेपेक्षा जास्त किंमतीची वाढ केल्याचा ठपका त्यागींवर ठेवण्यात आला होता.

त्यासाठी त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी दिेलेल्या स्पष्टीकरणाने सीबीआय अधिकाऱ्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्वरित त्यांनी जामीनासाठीचा अर्ज कोर्टात दाखल केला होता.

याबाबत आज झालेल्या सुनावणीत त्यांची 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close