ब्रिटिश पॉप गायक जॉर्ज मायकलचं निधन

December 26, 2016 11:00 AM0 commentsViews:

george

26 डिसेंबर : ब्रिटिश पॉप गायक जॉर्ज मायकलचं निधन झालंय. ते 53 वर्षांचे होते. जॉर्ज मायकलच्या पॉप गायकीनं चार दशकं व्यापलीयेत.

जॉर्जचं जरी निधन झालं असलं तरी त्याची गायकी दीर्घकाळ स्मरणात रहाणार असल्याची भावना व्यक्त केली जातेय. जॉर्ज मायकलनं 80च्या दशकात धुमाकूळ घातला होता.

देखणं रूप आणि तशीच गायकी असलेला मायकल तरूणांचा कायमच आवडता होता. विशेष म्हणजे स्टेज परफॉर्मन्स तसंच त्याच्या कॉन्सर्टसाठी लाखोंची गर्दी व्हायची. चार वेळेस त्याचे अल्बम नंबर वनवर राहिले. त्याच्या अल्बमच्या 10 कोटींपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्यात. हे सगळे अल्बमस सोलो आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close