उल्हासनगरमध्ये मणप्पुरम गोल्डच्या शाखेवर दरोडा, 30 किलो सोनं लुटलं

December 26, 2016 4:18 PM0 commentsViews:

 manpuram427 डिसेंबर : उल्हासनगर येथील मणप्पुरम गोल्ड ह्या सोन्यावर कर्ज देणाऱ्या गोल्ड बँकेची शाखा चोरट्यानी फोडली असून, यातून सुमारे 30 किलो सोन्याचा ऐवज चोरुन पोबारा केला.

उल्हासनगरच्या लालचक्की, कॅम्प 4 येथील शंकर कृपा आपार्टमेन्टमध्ये मणप्पुरम गोल्ड ची शाखा आहे. काल मध्य रात्रीनंतर अज्ञात चोरांनी, पाण्याच्या टाकीच्या पंप आणि मोटर रूमच्या येथून गॅसकटरने भगदाड पाडून, बाथरूमच्या मार्गे चोरानी मणप्पुरम गोल्डच्या शाखेत प्रवेश केला आणि येथील तिजोरी फोडून सुमारे 30 किलो सोन्याचे दागिने चोरुन पोबारा केला. वास्तविक मणप्पुरम गोल्डची ही शाखा भरवस्तीत असून एवढी मोठी घरफोड़ीं झाल्याने पोलिसांच्या एकूणच कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

याप्रकारणात शंकर कृपा इमारतीचा  वॅाचमन गायब असून पोलीस बँकेच्या बाहेर आणि बँकेच्या आत लावलेले 3 अश्या 4 सीसीटीव्ही कॅमऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असून त्यातून पोलिसांना तपासाचा धागा मिळण्याची शक्यता पोलीस विभागाकडून वर्तविली जात आहे. आता स्थानिक पोलिसांची 4 पथके, गुन्हा अन्वेषण आणि ठाणे आयुक्तांचे विशेष पथक अशी 5 पथके या गुह्याचा तपास करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close