स्मारकाऐवजी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करा -राज ठाकरे

December 26, 2016 4:54 PM0 commentsViews:

raj_thackery_newनाशिक, 26 डिसेंबर : कोट्यवधी रुपये पुतळ्यावर खर्च करून काय फायदा होणार त्यापेक्षा गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च करा अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीये. ते नाशिकमध्ये बोलत होते.

मागील आठवड्यात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचा जलपूजन आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर वांद्र्यात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी गड-किल्ले पुरातत्व खात्यातून मुक्त करा अशी मागणी केली होती.

याआधीही राज ठाकरे यांनीही गड- किल्ले संवर्धनाबाबत हीच मागणी केली होती. आज राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थिती करत स्मारकाच्या खर्चावर अपेक्ष घेतला. नुसते पुतळे उभे करून काय करणार…आतापर्यंत अनेक पुतळे उभारण्यात आले आहे. शिवस्मारकावर आता  करोडो रुपये खर्च करतात. पण शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. हा खर्च गडकिल्यांवर खर्च करा अशी मागणी राज ठाकरेंनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close