मुंबईवर पुन्हा हल्ल्याची शक्यता

May 18, 2010 3:38 PM0 commentsViews: 2

18 मे

मुंबईवर पुन्हा एकदा अतिरेकी हल्ल्या होण्याची शक्यता आहे.

आठ अतिरेक्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केला असून ते मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

हे अतिरेकी गुजरातमार्गे अक्कलकुवा इथे आले आणि त्यानंतर 14 एप्रिल 2010 ला ते मुंबईच्या दिशेने निघालेत.

30 एप्रिलला गृहखात्याला मिळालेल्या पत्रात हा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानातून 141 अतिरेकी समुद्रामार्गे भारतात घुसलेत. श्रीलंकेचा ध्वज असलेल्या बोटीतून या अतिरेक्यांनी मुंबई आणि गोवा शहर गाठले.

या दहशतवाद्यांना नेव्हीचे स्पेशल ट्रेनिंगही देण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा हाय अलर्ट देण्यात आला आहे.

हे सर्व दहशतवादी अल् कायदा या दहशतवादी संघटनेचे आहेत.

दरम्यान सागरी सुरक्षा कडक करण्यात आल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटले आहे.

close