कळवा खाडीजवळच्या झोपड्यांवर कारवाईविरोधात जितेंद्र आव्हाडांचा मोर्चा

December 26, 2016 5:37 PM0 commentsViews:

awahad_morcha26 डिसेंबर : कळवाखाडी किनाऱ्यावरील झोपड्यांवरील कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. जलवाहतुकीसाठी कळव्याखाडी लगतच्या या झोपड्यांवर बुलडोजर चालवण्यात येणार आहे..याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी हा मोर्चा काढलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारांपेक्षा नागरिक एकत्र आल्याने कळवा नाक्याला मोठ्या मेळाव्याचं स्वरुप प्राप्त झाले होतं. वागळेनगर, किसननगर , लोकमान्य नगर अणि संपूर्ण ठाण्यात झोपडपट्ट्या नाहीत का ? मग कळव्यातील झोपड्यांवरच कारवाई का असा प्रश्न उपस्थित करुन केवळ चमचेगिरी करणार्या अणि गरीब जनतेच्या झोपड्यांवर बुलडोजर फिरवण्याच ठराव करणाऱ्या शिवसेना भाजपच्या नगरसेवकांना तुम्ही मतदान करणार का ? असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. कळवा नाका येथील छत्रपती शिवजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आमच्या झोपड्या वाचवा असं शिवाजी महाराजाना साकडं घालून झोपड्यांवर कारवाई करूनच दाखवा असा इशाराच आव्हाडांनी दिला.यावेळी एकच वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close