रवी राणांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

December 26, 2016 7:58 PM0 commentsViews:

rana_office26 डिसेंबर : अमरावतीच्या बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केलीये. अमरावतीच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरुन ही तोडफोड झालीये. रवी राणा यांनी रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाअगोदरच तो वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी रवी राणांच्या ऑफिसची तोडफोड केली आणि त्यांच्या तीन कार्यकर्त्यांनाही मारहाण केलीये.

अमरावतीमध्ये  बडनेरा मार्गावर नरखेड रेल्वे लाईनवर रेल्वे उड्डाण पुलाचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरू आहे. यामुळे अनेक अपघात झाल्याने ४ दिवसांपूर्वी रवी राणा यांनी स्वतःच या पुलाचे उद्घाटन करून पूल खुला करून दिला. त्याननंतर २  तासानंतर शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ यांनी ही त्याच पुलाचे उद्धाटन केलं. यावेळी खासदारांनी राणा यांना शिवीगाळ केली असा आरोपही राणा यांनी केला. त्यामुळेच आज शिवसैनिकांनी दुपारी एकच्या सुमारास बडनेरा येथील कार्यालयात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली. त्याच वेळी तिथे उपस्थित महिला कर्मचारी सुषमा चौकीकर आणि मंगेश चव्हाण यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांनी राणा यांच्या कार्यालयावर चोख पोलीस बंदोबस्त लावला. तर आमदार राणा यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार आनंद अडसूळ यांच्याविरोधात प्रचंड नारेबाजी करत हल्लेखोर शिवसैनिकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close