संभाजी ब्रिगेडला खिंडार, प्रवीण गायकवाड शेकापमध्ये करणार प्रवेश

December 26, 2016 9:34 PM0 commentsViews:

pravin_gaikwad26 डिसेंबर : संभाजी ब्रिगेडने राजकारणात उडी घेत पक्ष स्थापनेची घोषणा करून काही दिवस उलटत नाही तेच संभाजी ब्रिगेडला खिंडार पडलंय. प्रवीण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडला रामराम ठोकला असून लवकरच शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापमध्ये प्रवेश करणार आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते पुण्याच्या ऐतिहासिक असणाऱ्या शनिवारवाडा येथे दिनांक 12 जानेवारी 2016 मध्ये शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे शेतकरी कामगार पक्षात राजकीय हालचालींना वेग मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close