आता साडेचार हजार घरांसाठी लॉटरी

May 18, 2010 5:33 PM0 commentsViews: 6

18 मे

म्हाडाच्या 3 हजार 449 घरांसाठीची लॉटरी आज पूर्ण झाली. चार टप्प्यांमध्ये ही लॉटरी काढण्यात आली.

अनेकांच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले. तर लाखो लोकांच्या पदरी निराशा पडली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही लॉटरी सुरू होती. सकाळपासून या ठिकाणी अर्जदारांनी गर्दी केली होती.

पण ज्यांना घरे लागली नाहीत, त्यांच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. 2011मध्ये म्हाडाच्या नवीन साडे चार हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

म्हाडाने याबाबतची आज घोषणा केली. यातील म्हणजे तीन हजार घरे अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी असतील.

close