नव्या वर्षात 10 महानगरपालिका,26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल

December 27, 2016 9:35 AM0 commentsViews:

MAHANAGARPALIKA

27डिसेंबर: नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकांनी होणारेय.कारण लवकरच 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी सुत्रांची माहिती आहे.

राज्यातील 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुका 7 जानेवारीला घोषित होण्याची शक्यता आहे.एकूण चार टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

महापालिका क्षेत्रात अंतिम मतदार यादी घोषित होण्याची तारीख 5 जानेवारी आहे. तर महापालिकांनी मुदत संपण्याआधी आणि नवीन महापौर निवड ही 8 मार्चच्या आधी करायची आहे. त्यामुळे 7 जानेवारीला निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. तसंच 15 ते 22 फेबुवारीमध्ये चार टप्प्यात होणार मतदान होण्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close