अफजल गुरुची फाईल राज्यपालांकडे

May 18, 2010 5:39 PM0 commentsViews: 1

18 मे

दिल्ली सरकारने अखेर संसद हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी अफजल गुरूच्या दयेच्या अर्जाची फाईल अखेर राज्यपालांकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहे.

आता राज्यपालांच्या शिफारसीसह ही फाईल केंद्रीय गृहमंत्रालय आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे जाईल.

सुप्रीम कोर्टाने अफजलला दिलेल्या फाशीच्या शिक्षेला दिल्ली सरकारने पाठिंबा दिला आहे. अफजल गुरुच्या दयेच्या अर्जाची फाईल 2006 पासून दिल्ली सरकारकडे पडून होती. यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारला 16 स्मरण पत्रे पाठवली होती.

दिल्लीच्या राज्यपालांनी अफजल गुरुची फाईल दिल्ली सरकारकडे परत पाठवल्याचे समजते. राज्यपालांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांचे उत्तर दिले जावे, अशी सूचना राज्यपालांनी दिल्ली सरकारला केली आहे.

close