स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला मान्यता

December 27, 2016 2:01 PM0 commentsViews:

 

mantralaya900x360

27 डिसेंबर : मराठा मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली अस्वस्थता शमवण्यासाठी अखेर देवेंद्र फडणवीस सरकारनं ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केलीय. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मंत्रालयाला मंजुरी देण्यात आलीय.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी असं मंत्रालय करण्याचे संकेत दिले होते. मराठ्यांचे निघालेले मोर्चे आणि त्यामुळे ओबीसींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन फडणवीस सरकारनं नव्या मंत्रालयाचा घाट घातल्याचं स्पष्ट आहे.  पण ह्या मंत्रालयाचा मंत्री कोण होणार, ओबीसीच होणार की इतर कुठल्या नेत्याला त्याचा भार देणार याबाबत आता चर्चा सुरु झालीय पण हे स्वतंत्र पदभार असलेलं मंत्रालय असेल असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलंय.

सरकारनं नवं मंत्रालय करण्यापेक्षा ओबीसींच्या विकासासाठी निधी देणार का हा महत्त्वाचा सवाल असल्याचं ओबीसी अभ्यासकांना वाटतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close