चिदंबरम यांचे आवाहन नक्षलवाद्यांनी धुडकावले

May 18, 2010 5:45 PM0 commentsViews: 1

18 मे

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेले चर्चेचे आवाहन माओवाद्यांनी धुडकावून लावले आहे. सरकारने पहिल्यांदा ग्रीन हंट कारवाई थांबवावी, असे माओवाद्यांचा छत्तीसगड भागातील कमांडर रामण्णा याने 'आयबीएन-नेटवर्क'शी बोलताना सांगितले.

माओवाद्यांविरोधातील सरकारची कारवाई थांबल्याशिवाय शस्त्रसंधी शक्य नसल्याचे त्याने म्हटले आहे. दंतेवाडात काल झालेल्या नक्षली हल्ल्यानंतर चिदंबरम यांनी 'आयबीएन-नेटवर्क'ला दिलेल्या खास मुलाखतीत हे चर्चेचे आवाहन केले होते.

दरम्यान माओवाद्यांविरोधात एअर फोर्सचा वापर करणार नसल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे. केवळ हवाई पाहणीसाठीच एअर फोर्सचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही माओवाद्यांशी चर्चा करायला सरकार तयार असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.

close