सनबर्न फेस्टिव्हलला केसनंद गावकऱ्यांचा ‘रेड सिग्नल’

December 27, 2016 5:04 PM0 commentsViews:

sunburn27 डिसेंबर : पुण्यात होणारं सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात अडकलंय. हा सनबर्न फेस्टिव्हल तरुणांना व्यसनाकडे आकर्षित करेल, त्यामुळे  तरुणांचं नुकसान होईल म्हणून हा सनबर्न फेस्टिव्हल कदापि होऊ देणार नाही असा इशारा केसनंद ग्रामस्थांनी दिला.

पुण्यात होणार सनबर्न फेस्टिव्हल भारतीय युवकांना व्यसनाधीन बनवणारा आहे. हा फेस्टिव्हल आम्ही कदापि होऊ देणार नाही. हा फेस्टिव्हल होत असेल हा कार्यक्रम बंद पाडू असा खणखणीत इशारा गावकऱ्यांनी दिलाय.

सनबर्न फेस्टिव्हलला केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने परवानगीबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेमध्ये नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे का देण्यात येवू नये यासाठी गावातील गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले पण त्याच्यात एकमत झाले नसल्याने परवानगीविना ही सभा तहकुब करुन अनिर्णीत ठेवण्यात आली. परवानगीचा कोणताही निर्णय न घेता ग्रामसभा आरोप प्रत्यारोप करुण सभा उपसरपंच,सचिव कोणताही निर्णय न घेता तहकूब करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close