बेपत्ता ‘जय’ तेलंगणाच्या जंगलात दिसला ?

December 27, 2016 6:30 PM0 commentsViews:

jay_tigar27 डिसेंबर  : तेलंगणाच्या आदीलाबाद जिल्हयात तामसा जंगलात महाराष्ट्रातून आलेल्या वाघाच्या भीतीने दहशत पसरलीय. हा वाघ जय असल्याच्या शक्यता वनमंञी सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलीय.

मुनगंटीवार यांनी तेलंगणाचे वनमंञी जोग रामन्ना आणि तेलंगणाच्या मुख्य वनसंरक्षकाशी दुरध्वनीवर संवाद साधला आहे. वाघाचे कॅमेरा ट्रॅपचे फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे..

महाराष्ट्रातील पेनगंगा नदीच्या पलीकडील तेलंगणाच्या तामसी, पिपलकोट या भागात महाराष्ट्रातून आलेल्या एका वाघाचे ठिकाण आढळले आहे. त्याची शरीरयष्टी लांब आहे पण तो जय आहे का नाही याची खाञी करत आहोत अस आदीलाबादचे उपवनसंरक्षक रामबाबु यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close