‘लैला’ आंध्रात धडकणार

May 19, 2010 10:05 AM0 commentsViews: 5

19 मे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले लैला वादळ मध्यरात्रीपर्यंत किंवा गुरुवारी सकाळीपर्यंत आंध्रप्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे.

आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतील किनारपट्टी भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.

ओंगोल आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान वादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनार्‍यावरी रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

बचावकार्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. शिवाय किनारपट्टीच्या भागात गस्तही वाढवण्यात आली आहे.

close