पुण्यात साप तस्कर जेरबंद, घरात सापडले 125 विषारी साप

December 27, 2016 9:47 PM0 commentsViews:

पुणे, 27 डिसेंबर : जिल्ह्यातल्या चाकणमध्ये सहारा सिटीत आज पोलिसांनी सापांची तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 100 पेक्षा जास्त साप जप्त करण्यात आलेत.

चाकण औद्योगिक नगरीमध्ये आज चाकण पोलीस आणि जुन्नर वनविभागाने ही संयुक्त कारवाई केली. या टोळीवर खराबवाडी येथील सहारा सिटी या अलिशान रेसिडन्सी सोसाटीतील फ्लटमध्ये छापा टाकुन,पती-रणजित पंढरिनाथ खारगे ,पत्नी-शैलेजा रणजित खारगे आणि त्यांचा एक साथीदार यांना अटक करण्यात आली. हे साप तस्कर या सापांना जंगलातून पकडून आणून आपल्या रहात्या फ्लॅटमध्ये 100 ते १२५ विषारी साप बंदीस्त करुन ठेवून या सापांचे विष काढुन विकत होते. या विषाची बाजारात मोठी किंमत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close