सांगा कसं जगायचं ?,पैशाअभावी शेतकऱ्याने फिरवला टोमॅटोवर ट्रॅक्टर !

December 27, 2016 7:01 PM0 commentsViews:

27 डिसेंबर : नोटबंदीला आता 50 दिवस पूर्ण होत आहे. शहरीभागात पैशांची टंचाई तर आहेच पण बळीराजा पुरता हैराण झालाय. मजुरांना द्यायला पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांने टोमॅटोच्या शेतीवर ट्रॅक्टर फिरवला.

नोटबंदीमुळे ग्रामिण भागात शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. बाजारात पैशाची आवक नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या टोमॅटोला 1 रुपये किलो असा भाव मिळतोय. भिवापूर इथल्या एका उत्पादक शेतकऱ्यांने टोमॅटो तोडणाऱ्या मजूरांना देण्यासाठी पैसे नसल्यामुळे व्यथित होवून दोन एकरामधला टोमॅटो ट्रॅक्टरने नष्ट केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close