मोदी म्हणाले होते मला चाबकाने फोडा, मग थर्टीफस्टला काय करायचं ?- उद्धव ठाकरे

December 27, 2016 10:21 PM1 commentViews:

modi mumbai visit uddhav thackery27 डिसेंबर : लोकांच्या अडचणी दूर झाल्या नाही तर चाबकाचे फटके मारा असे सांगणाऱ्या मोदींचं काय करायचं ? असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय. तसंच नोटाबंदीमुळे मजूर, शेतकरी, मध्यमवर्गीय या सगळ्यांना त्रास होतोय. त्रासाबाबत बोललं तर तो देशद्रोही ठरवला जातोय असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय. नोटाबंदी हे मृगजळ असल्याचाही आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धुळे नंदूरबार येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धुळे नंदूरबारकडे आम्ही लक्ष दिले नाही ही आमची चूक मी मान्य करतो. पण  मुंबई कोणत्याही परिस्थितीत आपण राखणारच. जास्तीत जास्त महापालिका जिंकण्याचे आपले लक्ष्य आहे. जास्तीत जास्त महापौर शिवसेनेचे झाले पाहिजेत असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला.

आता परिस्थिती बिकट आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधानांनी भाषण केले ते ऐकल्यानंतर काही वेळाने मला वाटले की याला काही शेवट आहे की नाही.  नोटाबंदीचा त्रास होतोय असे बोललो की तो बेईमान..म्हणजे आपण आणि शेतकरी बोललो की बेईमान ठरतो. आता मोदी म्हणाले होते 50 दिवस मला द्या नाहीतर चाबकाने फोडा. आता तीस तारखेला पन्नास दिवस पूर्ण होत आहेत मग काय करायचं थर्टी फर्स्ट? असा सवालही त्यांनी उपस्थिती केला.

50 दिवसांनंतर ईमानदार लोकांचा त्रास कमी होईल असं मोदी म्हणाले होते. कधी होणार ते माहिती नाही. नोटाबंदी हे मृगजळ आहे. मोदींनी गावातील महिलांना अनवाणी पायाने डांबरी रस्त्यावर, उन्हात पाय भाजत असताना मृगजळाच्या मागे चालायला सांगितलं आहे आणि मृगजळ कधी मिळत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • yogesh patil

    nagarpalika nivadnukit janatene gharacha rasta dakhavala tarahi sahebana akkal yayala tayar nahi

close