विदर्भात उष्माघाताचे 20 बळी

May 19, 2010 10:12 AM0 commentsViews: 69

19 मे

विदर्भात उष्माघातामुळे गेल्या 24 तासांत 6 जणांचा बळी गेला आहे. सोमवारी उष्माघाताने विदर्भात 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विदर्भात गेल्या 48 तासांत उष्माघाताने बळी गेलेल्यांची संख्या 20 झाली आहे.

नागपुरात 46.4, तर वर्धा जिल्ह्यात 47. 4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यातच लोडशेडिंगचा फटका बसत असल्याने नागरिक अधिकच हैराण आहेत.

close