रेकाॅर्डब्रेक ‘दंगल’,155कोटींचा पल्ला

December 28, 2016 12:53 PM0 commentsViews:

dangal4

28 डिसेंबर : ‘दंगल’ची बाॅक्स आॅफिसवर जोरात दंगल सुरू आहे. पाचव्या दिवशी सिनेमानं कमावलेत 155कोटी रुपये.

दंगल वेगवेगळे रेकाॅर्ड बनवतोय. आणि ते फक्त भारतातच नाहीत, तर अमेरिकेतसुद्धा.

अमेरिकेत दंगलनं पहिल्या दिवशी 12 कोटींची कमाई केलीय.

उत्तर अमेरिकेत वीकेण्डला सर्वाधिक कमाई करणारा दंगल पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. तिकडे कमाई झालीय 27.10 कोटींची.

या रविवारी ख्रिसमस होता,या दिवशी जगभर सर्वांना सुट्टी असते, त्यामुळे मोठा गल्ला मिळवून देण्यासाठी चित्रपटाला हा दिवस फायदेशीर ठरला.हा चित्रपट ख्रिसमसला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.42.35 कोटींचा गल्ला दंगलने ख्रिसमसला जमा केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close