रशियाच्या अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सची तपासणी

December 28, 2016 8:04 AM0 commentsViews:

 

russian plane crash

28 डिसेंबर : रशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. या ब्लॅक बॉक्सची तपासणी तज्ज्ञ करतायत. रशियाचं हे लष्करी विमान रविवारी काळ्या समुद्रात कोसळलं. यामध्ये ९२ जणांचा मृत्यू ओढवलाय. आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत.

रशियाचं विमान सीरियाकडे जाताना काळ्या समुद्रात कोसळलं. या विमानात 92 जण होते. स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे 5 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर अवघ्या दोनच मिनिटात टीयू 154 या लढाऊ विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर सोची शहराजवळ काळ्या समुद्रात ते कोसळल्याचं वृत्त आलं.

रशियाच्या किनाऱ्यापासून समुद्रात दीड किमी अंतरावर 50 ते 70 मीटर खोलीवर या विमानाचे अवशेष सापडले. वैमानिकाच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे हे विमान कोसळलं असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. या विमानात 84 प्रवासी आणि 8 कर्मचारी होते.

रशियाच्या या विमानातून सैनिक, पत्रकार आणि संगीतकार सीरियाला चालले होते. अपघातात या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close