आता 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा वापरल्या तर होईल कारवाई

December 28, 2016 4:19 PM0 commentsViews:

Rs-500-and-Rs-1000-Main-Article-1-128 डिसेंबर :  आता 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा वापरल्या तर दंडात्मक कारवाई करण्याचा वटहुकूम केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जारी केला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 500 आणि 1000 च्या नोटा देण्याचं मुल्य संपुष्टात येणार आहे. त्यामुळे 31 मार्चनंतर जुन्या नोटा ठेवणं महागात पडू शकतं.

नोटबंदीला आज 50 दिवस पूर्ण झाले आहेत. आज 50 व्या दिवशीही निर्णय जाहीर करण्याचा सपाटा सुरूच आहे. 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द  करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला घेण्यात आला. चलन रद्द करण्याची मुदत दोन दिवसांनंतर संपणार आहे. याबाबत आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोटबंदीचा आढावा घेण्यात आला.

500 आणि 1000 च्या नोटा देण्याचं सरकार आणि रिझर्व्ह बँकेचं वचन आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम जारी केलाय. यापुढे 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगता येणार नाही. जर 30 डिसेंबरनंतर तुम्ही बँकात पैसे जमा करण्यासाठी गेला तर तुम्हाला याबद्दल खुलासा द्यावा लागणार आहे.

तसंच रिझर्व्ह बँकेत जाऊन नोटा जमा कराव्या लागणार आहे किंवा टपालाद्वारे नोटा पाठवाव्या लागणार आहे. पोस्टाने नोटा पाठवत असताना तुम्ही स्वत: रिझर्व्ह बँकेत का हजर राहु शकला नाही याचे उत्तरही द्यावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक तुमच्या उत्तरांवर समाधानी नाही राहिली तर नोटा स्वीकारण्यास मनाईही करू शकते.

‘द स्पेसिफाईड बँक नोट्स केसेशन अॅाफ लायबिलिटीज् अॅार्डिनेंस’ असं या अध्यादेशाला नाव देण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close