50 दिवसांत किती काळा पैसा जमला?, राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

December 28, 2016 4:35 PM0 commentsViews:

 rahul_gandhi_vs_modi28 डिसेंबर : 50 दिवसांत नक्की किती काळा पैसा सरकारकडे जमा झाला आहे. याचा देशाला हिशेब द्या अशी थेट मागणीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीये. तसंच स्वीस बँकेतील खातेदारांची यादी लोकसभेत जाहीर करावी असं आव्हानही त्यांनी मोदींना दिलं.

काँग्रेस पक्षाच्या 132 व्या वर्धापनदिन आणि  नोटबंदीच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी 50 दिवसांत नक्की किती काळा पैसा सरकारकडे जमा झाला याचा देशाला हिशेब देण्याची मागणी राहुल यांनी केली.

स्वीस बँकेत पैसे ठेवलेल्या लोकांची यादी आता मोदी यांच्याकडे आहे त्यांनी ती लवकरात लवकर लोकसभेत जाहीर करावी असं आव्हानही त्यांनी मोदींना दिलं.

आता बँकांमध्ये जमलेला पैसा हा लोकांचा पैसा असल्याने आता या पैसा ठेवण्यावरची बंधनं त्वरीत उठवण्यात यावीत अशी मागणीही त्यांनी केलीये.

नोटबंदीच्या निर्णयानंतर ज्या लोकांना आपला जीव आणि रोजगार गमवावा लागला त्यांना त्वरीत सरकारतर्फे मदत जाहीर करण्याचं आवाहनही राहुल गांधींनी केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close