कलमाडींची सावध खेळी,आयअोएचं अध्यक्षपद नाकारलं

December 28, 2016 5:19 PM0 commentsViews:

kalmadi_ioa28 डिसेंबर : सुरेश कलमाडींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं मानद आजीवन अध्यक्षपद नाकारलंय. या संघटनेच्या अध्यक्षपदी कलमाडींची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली.  त्यामुळे कलमाडींनी हा निर्णय घेतलाय.

मला हा मान दिल्याबद्दल मी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे आभार मानतो. पण सध्या मी हे अध्यक्षपद स्वीकारणं योग्य होणार नाही, असं कलमाडी यांनी म्हटलंय. माझ्यावरच्या सगळ्या आरोपांमधून मी मुक्त होईन, असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले.

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या आजीवन अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांची निवड झाली होती. दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची एकमताने निवड झाली.

सुरेश कलमाडी हे कॉमनवेल्थ घोटाळ्यात आरोपी असतानाही त्यांची निवड झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यासोबतच अभय चौटाला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

सुरेश कलमाडी हे १९९६ ते २०११ या काळात इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते.  दिल्ली कॉमनवेल्थ घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांना १० महिने तुरुंगातही जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close