रतन टाटा संघ मुख्यालयात, भागवतांशी बंद द्वार चर्चा

December 28, 2016 5:36 PM0 commentsViews:

tata_in_rss28 डिसेंबर : टाटा सन्स उद्योगसमूहाचे हंगामी चेअरमन रतन टाटा आज नागपूरच्या रेशीमबागमधल्या संघ मुख्यालयात गेले होते. सरसंघचालक मोहन भागवत आणि रतन टाटा यांची बंद दाराआड चर्चा झाली. सायरस मिस्री यांच्या हकालपट्टीनंतर ही भेट झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

याआधी रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती. टाटा ग्रुपच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी झाल्यानंतर रतन टाटा पंतप्रधानांना भेटले होते. त्यामुळे तेव्हाही बरीच चर्चा रंगली होती.

रतन टाटा आणि मोहन भागवत यांच्या भेटीचा तपशील अजून कळू शकलेला नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close