दरोडेखोरांकडून व्यापार्‍याचा खून

May 19, 2010 11:00 AM0 commentsViews: 3

19 मे

तुळजापूर शहरात दरोडेखोरांनी रक्कम लुटतानाच एका व्यापार्‍याचा खून केला. हफराबद्दी सोळंकी असे या व्यापार्‍याचे नाव आहे.

20 हजारांची रक्कम लुटून दरोडेखोर पसार झाले.

या घटनेचा निषेध करण्यासाठी तुळजापुरातील व्यापार्‍यांनी रास्ता रोको आंदोलन करून सोलापूर-औरंगाबाद रस्ता जाम केला.

लोडशेडिंगमुळेच दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत, लोडशेडींग बंद करण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे.

close