पुण्यात ‘सनबर्न’ होणारच,हायकोर्टाचा ग्रीन सिग्नल

December 28, 2016 6:03 PM0 commentsViews:

sunburn4328 डिसेंबर :  ‘सनबर्न’ पार्टीला अखेर हिरवा कंदील मिळालाय. मुंबई हायकोर्टाने ‘सनबर्न’ पार्टीला परवानगी दिली आहे. स्थानिकांनी दाखल केलेली  याचिका  मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

पुण्यात ‘सनबर्न’ कार्यक्रम होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. सनबर्नला परवानगी नाकारण्याबाबत मुंबई हायकोर्टाने केलेली याचिका फेटाळून लावलीये. या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच परवानगी दिलेली असल्याने हायकोर्टाने त्यात हस्तक्षेप करायला नकार दिलाय. सनबर्न या कार्यक्रमाला हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध दर्शवलाय. संतांची भूमी असलेल्या पुण्यात हा कार्यक्रम होऊ नये यासाठी ज्या गावात तो आयोजित करण्यात आलाय त्या ग्रामस्थांनीही त्याला विरोध केला होता.

सनबर्न संदर्भात मुंबई हायकोर्टाचे जस्टिस जी एस कुलकर्णी यांच्या चेंबरमध्ये सुनावणी झाली.याचिकाकर्ते दत्तराय पासलकर यांनी आपलं म्हणणं ऐकून घेतले नाही असं म्हटल्यानंतर ही सुनावणी घेण्यात आली, या कार्यक्रमाच्यासाठी कोणतीही वृक्षतोड करण्यात आली नाहीये तसंच कोणतंही खनिज उत्खनन करण्यात आलं नाहीये असं आयोजकांचं म्हणणं आहे. इतक्या उशिरा कोर्टात धाव का घेतली? या कार्यक्रमादरम्यान काय होऊ शकते याची आपल्याला कल्पना असावी अशी विचारणा जस्टिस कुलकर्णींनी याचिकाकर्त्यांना केली. तसंच या कार्यक्रमाला स्थगिती देण्यासाठी हायकोर्टाने नकार दिलाय. कार्यक्रम थांबवण्यासाठी अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची विनंती हायकोर्टाने अमान्य केली आहे.

 काय आहे सनबर्न महोत्सव

- आशिया खंडातील सर्वात मोठा संगीत महोत्सव
- पहिल्यांदा सनबर्न महोत्सवाचं आयोजन गोव्यात 2007मध्ये
- विविध पदार्थांची मेजवानी, संगीत आणि नृत्य हे खास आकर्षण
-  आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कलाकारांना घेऊन विद्युत उपकरणांच्या साधनाद्वारे संगीताचे आयोजन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close