राजकारण्यांना स्मशानातही खुर्चीसह जावं असं वाटतं -अण्णा हजारे

December 28, 2016 7:34 PM0 commentsViews:

 anna on drough
28 डिसेंबर : काही राजकारण्यांना स्मशानात जातानाही खुर्चीत बसून जावं असं वाटतं त्यामुळेच आज देशाची अवस्था वाईट झाल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त  केलंय.

कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले अपक्ष विजयराव वहाडणे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाला अण्णा उपस्थित होते. यावेळी अण्णांनी राजकारण्यांवर टीका केली. माणसं सगळी चांगली असतात मात्र सत्तेत गेल्यावर त्यांना खुर्चीचा गुणधर्म लागतो आणि ती बदलतात आणि बुद्धीचा पालट होतो असंही अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

राज्यात सर्वाधिक मतांनी आणि कुठल्याही पक्षाचा आधार न घेता विजयराव वहाडणे यांना जनतेने निवडून दिले असून भाजपातून हकालपट्टी झालेल्या वहाडणे यांना पाठिबा देत अण्णांनी यावेळी राज्यात आदर्श निर्माण होईल असं आदर्श काम नगरपालिकेने करावं असं आवाहन यावेळी अण्णांनी केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close