त्र्यंबकेश्वरमध्ये 2 पुरोहितांकडून 2 कोटी रोख, साडेचार किलो सोनं जप्त

December 28, 2016 10:29 PM0 commentsViews:

trambkeshowar_note3नाशिक, 28 डिसेंबर : नोटबंदीनंतर काळा पैसा लपवणाऱ्यांना आता आयकर खात्याच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. आणि यातूनच त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांची चौकशी आयकर अधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. आयकर विभागाच्या चौकशीच 2 पुरोहितांकडे घबाड हाती लागलंय. या पुरोहितांकडून तब्बल 2 कोटी रोख आणि साडेचार किलो सोनं जप्त करण्यात आलंय. अजूनही 9 पुरोहित आयकर विभागाच्या रडारवर आहे.

श्री शंकराचं आपल्या देशातील पवित्र देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविकांची मोठी गर्दी असते.आणी याच ठिकाणी केलं जाणारं नारायण-नागबली, कालसर्प या पूजांचं कर्मकांड हे या जागी केलं जातं. आणि यामुळं करोडो रुपयांचं रोख चलन इथे रोजच व्यवहारात येतं. नेमक्या याच कारणानं आयकर खात्यानं आपली नजर त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांकडे वळवलीय.

शनिवारी आयकर विभागाने गणपती शिखरे, आणि  निषाद चांदवडकर या प्रमुख पुरोहितांकडे आयकर खात्याचे अधिकारी तपासणी सुरू केली. चार दिवस चाललेल्या या चौकशीतून तब्बल 2 कोटी रोख आणि साडेचार किलो सोनं आयकर विभागाच्या हाती लागलंय. याच गावातील 9 पुरोहिताना त्यांनी नोटीस बजावल्याचं समजतंय. त्यामुळे आता या पुरोहितांकडून अजून काय माहिती समोर येते हे पाहण्याचं ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close