रक्तदान,5 मुली दत्तक ; एका आदर्श लग्नाची गोष्ट !

December 28, 2016 11:50 PM0 commentsViews:

28 डिसेंबर : अमरावतीमध्ये अगदी साध्या पद्धतीने एक विवाह सोहळा पार पडला . कुठल्याही पद्धतीचा हार तुरा न घालता सुरू असलेल्या रूढी परंपरेला फाटा देत हा विवाह झाला. आणि विशेष म्हणजे विवाह बंधनात अडकण्यापूर्वी या जोडप्यांनी रक्तदान केले आणि नोंदणी विवाहानंतर या नवदाम्पत्यांनी तपोवन इथल्या पाच अनाथ मुलींना दत्तकही घेतलं. शिवाजीराव पटवर्धन यांच्या तपोवन याठिकाणी हा आगळा वेगळा विवाह संपन्न झालाय.

लग्न म्हणजे कुटुंबाची हौस पूर्ण करण्याचा सोहळा…नवरा आणि नवरीच्या घरात जवळपास महिनाभर आधीपासून तयारी सुरु होते. लग्न पत्रिका, हळदी, ब्यांड , हार तुरे, हॉल, पंचपक्वान्नं हे सगळं समोर येतं…पण अमरावतीत काल झालेला सोहळा हा यापेक्षा अगदी वेगळा होता. गुंजन गोळे आणि अश्विन तळेगावकर या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी तपोवनात लग्न केलं.

gunjanलग्नाचा सोहळा सुरू होण्यापूर्वी सगळ्या वऱ्हाडी मंडळींनी रक्तदान केलं. लग्न लागण्यापूर्वी नवरदेव आणि नवरी यांनीही रक्तदान केलं. अवास्तव खर्च टाळून  नोंदणी पद्धतीनं हे लग्न झालं.

इतकंच नाही तर तपोवनातील पाच अनाथ मुलींनाही या नवविवाहित जोडप्यानं दत्तक घेतलं. नवी नवरी  गुंजन गेल्या 4 वर्षांपासून एचआयव्ही ग्रस्त आणि मनोरुग्णांसाठी काम करते तर अश्विन बांधकाम व्यावसायिक आहेत. या पाच मुलींचा शिक्षणापासून तर विवाहापर्यंतचा खर्च नवदाम्पत्य करणार आहेत. यामधून बचत झालेल्या पैश्यात एक रुग्णवाहिका घेण्याच दोघांनी ठरवलं आहे.

यापूर्वी अभय देवरे या आयआरएस  तरुणानं  शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलाना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देवरे दाम्पत्यांनी घेतली होती. औरंगाबादमध्येही श्रेया मुनोत या तरुणीनं स्वत:च्या लग्नाच्या निमित्तानं 90 कुटुंबीयांना घरं बांधून दिली. लग्नातला हौसेखातर होणारा लाखोंचा खर्च टाळून सामाजिक बांधीलकी जपत आपल्यासोबत वंचितानांही  आयुष्यभराचं समाधान मिळवून देणाऱ्या या जोडप्यांना सलाम…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close