दानवेंना ‘लक्ष्मीदर्शन’ वक्तव्य भोवलं

December 29, 2016 12:03 PM1 commentViews:

ravashesb_Danve

29 डिसेंबर : रावसाहेब दानवेंना ‘लक्ष्मीदर्शन’ वक्तव्य भोवलं असून रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैठणमध्ये दानवेंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रात्री उशिरा रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल झाला आहे.

‘निवडणुकीची पहिली रात्र महत्त्वाची असते.कदाचित अचानक लक्ष्मीदर्शन निवडणुकीच्या आदल्या दिवशी होत असतं.अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका. तिचं स्वागत करा.’ पैठणमधल्या निवडणूक प्रचाराच्या वेळी दानवेंनी केलेंलं हे वक्तव्य त्यांना महाग पडलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sanjay Kulkarni

    आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय होते हे कधीच कळत नाही. निर्णय लागेपर्यंत अशा ’संशयीत’ गुन्हेगारांना (accused) निवडणुक कामकाजात भाग घेण्यास बंदी घातली पाहिजे.
    याचा दुरुपयोग होणार नाही यासाठी
    १. गुन्हा दाखल करताना पूर्ण काळजी घेतली पाहिजे
    २. निवडणूक आयोगाने चौकशी तत्परतेने करून, निर्णय लौकरात लौकर दिला पाहिजे.

close