नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान देशाला संबोधणार

December 29, 2016 2:04 PM0 commentsViews:

modi new

29 डिसेंबर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत.नोटबंदीच्या घेतलेल्या निर्णयानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी संवाद साधणार असल्यामुळे अनेकांना आता उत्सुकता लागून राहिली आहे की पंतप्रधान काय घोषणा करणार.

त्यातच ‘मन की बात’मध्ये देखील मोदी यांनी पुढची घोषणा 31 डिसेंबरला करणार असल्याचं सूतोवाच केलं होतं. शिवाय नोटबंदीलाही 50 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलतायत, याबद्दल उत्सुकता आहे.

त्यामुळे मोदींच्या 31 डिसेंबरच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close