अधिकार्‍याला दूषित पाण्याची अंघोळ

May 19, 2010 11:37 AM0 commentsViews: 6

19 मे

सोलापूर शहरात गेल्या 15 दिवसांपासून येत असलेल्या दूषित पाण्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. संतप्त नागरिकांनी आज अधिकार्‍यांना बुधवार पेठ येथे बोलावून दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.

तसेच त्यांना याच दूषित पाण्याने आंघोळही घातली. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे त्रासलेल्या सोलापूरकरांनी आज पालिका कार्यालयावर मोर्चा काढून आपला राग व्यक्त केला.

महिलांनी पालिकेच्या गेटसमोर मडकी फोडून आपला निषेध व्यक्त केला. तसेच रास्तारोको करून वाहतूक थांबवून ठेवली.

close