‘त्या’ 91 लाख प्रकरणी सुभाष देशमुखांच्या ‘लोकमंगल’ला क्लीन चिट

December 29, 2016 5:22 PM0 commentsViews:

subhash_deshmukh329 डिसेंबर : 91 लाख रुपये साप़डल्या प्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टीस्टेटला क्लीन चिट मिळालीये. आयकर विभाग आणि जिल्हा सहनिंबधकानी चौकशीअंती क्लीन चिट दिली आहे.

नगरपालिका निवडणुकींदरम्यान लोकमंगलची 91 लाख 50 हजार रक्कम पकडली गेली होती. याचा तपास आयकर विभाग आणि जिल्हासह निंबधकाकडे दिला होता. आज त्यांचा चौकशी अहवाल आलाय. यामध्ये पकडलेली रक्कम लोकमंगल बँकेची असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असून ती रक्कम लोकमंगलला परत दिली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सांगितलंय. सुरुवातीला या प्रकरणापासून हात काढणारे सुभाष देशमुख यांनी प्रकरण अंगाशी येताच ही रक्कम लोकमंगलची असल्याची कबुली दिली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close