नोटबंदीमुळे करात वाढ, 500 च्या आणखी नोटा आणणार -अरुण जेटली

December 29, 2016 6:31 PM0 commentsViews:

jaitly3429 डिसेंबर : नोटबंदीच्या निर्णयाला ५० दिवस उलटून गेल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि नोटबंदीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या फायद्यांची माहिती झाली. 500 रुपयांच्या आणखी नोटा चलनात आणण्यात येणार आहेत, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

नोटबंदीचे फायदे आता दिसायला लागलेत, असा दावा त्यांनी केला.रिझर्व्ह बँकेकडे पुरेसे पैसे आहेत. देशभरात प्रत्यक्ष करात 14.4 टक्क्यांची वाढ झालीय. नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत करवसुली जास्त झाली, असं अरुण जेटली म्हणाले.

पेट्रोलियम पदार्थ, पर्यटन उद्योग आणि शेतीवर नोटबंदीमुळे काहीही परिणाम झाला नाही. तसंच रब्बीचं क्षेत्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 6.3 टक्क्यांनी वाढलं, अशी माहिती त्यांनी दिलीय.

म्युच्युअल फंडात 11 टक्क्यांची वाढ झालीय. त्याचबरोबर अप्रत्यक्ष करात 26.2 टक्क्यांची  आणि सीमा शुल्कात 6 टक्क्यांची वाढ झालीय, असं अरुण जेटली म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close