तुकाराम मुंढेंची जानेवारीत बदली ?

December 29, 2016 9:15 PM0 commentsViews:

Tukaram-Mundhe29 डिसेंबर :  नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या हालचालींना वेग आलाय. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुकाराम मुंढे यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे.

नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांवर आयुक्त तुकाराम मुढेंनी धडक कारवाई केली होती. त्यांच्या या कारवाईमुळे  भूमाफियांचं कंबरडं मोडलं होतं. मुंढेंच्या या निर्णयाच्या विरोधात शिवसेनेनं अविश्वासाचा प्रस्ताव मांडला होता. आणि सर्वसहमतीने तो मंजूरही करण्यात आला होता. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढेंची पाठराखण करत प्रस्ताव फेटाळून लावला होता. आता पुन्हा एकदा मुंढेंच्या बदलीबद्दल हालचालींना वेग आलाय.

मुंढेंची जानेवारीच्या पहिल्या आढवड्यात बदलीची शक्यता आहे. या बदलीसाठी शिवसेनेनं पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरू केले असून  मुख्यमंत्र्यांवर बदलीसाठी दबाव आणला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिवसेनेच्या दबावापुढं झुकणार का ?  आणि मुंढेंची बदली होणार का ?, हे पाहण्याचं ठरणार आहे. मात्र, या बदलीमुळे राज सरकारला नवी मुंबईकरांची नाराजी ओढावून घ्यावी लागणार आहे.

मुंढेंची बदली कशासाठी?
तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधींमध्ये कायम वाद होत राहिले
तुकाराम मुंढेंविरोधात महापालिकेत अविश्वास ठराव मंजूर
भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचाही विरोध
शिवसेना मुंढेंना हटवण्यासाठी आग्रही आहे
गावठाणांतील अतिक्रमणांवर हातोडा टाकल्यानं स्थानिक लोकांचा विरोध


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close