लोकलमध्ये एसी कॉम्प्रेसरचा स्फोट

May 19, 2010 11:54 AM0 commentsViews: 2

19 मे

मुंबईतील माटुंगा रोड स्टेशनवर लोकलमध्ये एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. यात एक जण गंभीर झाला आहे.

दुपारी दीड वाजता बोरिवली स्टेशनहून चर्चगेट स्टेशनला जाणार्‍या स्लो लोकलमध्ये एका माल डब्यात हा कॉम्प्रेसर फुटला.

याच डब्यात बसलेल्या विनयकांत जोशी यांच्या पायावर हा कॉम्प्रेसर पडला. त्यातून धूर येऊ लागला आणि त्याचा स्फोट झाल्याचे जोशी यांनी सांगितले.

हा छोटा कॉम्प्रेसर असल्याने यात मोठी झाली नाही. काही वेळासाठी लोकल विस्कळीत झाल्या होत्या. आता रेल्वेसेवा पूर्वपदावर आली आहे.

close