पुणे रेल्वे स्टेशनवर 25 लाख जप्त, सर्व नव्या 2000 च्या नोटा

December 29, 2016 11:29 PM0 commentsViews:

pune_sation_note329 डिसेंबर : पुणे लोहमार्ग पोलिसांनी आज पुणे रेल्वे स्थानकावर वाराणसीच्या दोन आरोपीकडून २५ लाख रुपयाच्या दोन हजारच्या नव्या नोटा जप्त केल्या. ज्ञान गंगा एक्स्प्रेसने वाराणसीहुन पुण्याला येत असलेल्या दोन आरोपीकडून या नोटा जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मनीष दिवेदी आणि प्रमोदकुमार जैसवाल या दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे. मनीष आणि प्रमोद यांनी वाराणसीहुन ही रक्कमी कुणाकडून आणली आणि पुण्यात  कुणाला देणार होते. याचा लोहमार्ग पोलीस तपास करत आहेत. तसंच हा हवालाच पैसा आहे का ? या दृष्टिकोनातून देखील लोहमार्ग पोलीस तपास करत आहेत.  जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे पुढील तपासा करिता सुपूर्द करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close