माहिमतुरांना कोर्टात हजर करण्याचे आदेश

May 19, 2010 12:03 PM0 commentsViews: 7

19 मे

1 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हायराईज कमिटीचे सदस्य शैलेश माहिमतुरा यांना तातडीने कोर्टात हजर करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

अटक केल्यानंतर माहिमतुरा यांना छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.

आज त्याला डिस्चार्ज मिळाला असला तरी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलेले नाही. त्यामुळेच कोर्टाने माहिमतुराला हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

close