#फ्लॅशबॅक2016 : क्रीडा क्षेत्रात ‘हे’ खेळाडू चमकले

December 29, 2016 11:59 PM0 commentsViews:

2016 Rio Paralympics - Men's High Jump - T42 Final - Olympic Stadium - Rio de Janeiro, Brazil - 09/09/2016. Mariyappan Thangavelu of India celebrates with his gold medal during the victory ceremony.   REUTERS/Jason Cairnduff FOR EDITORIAL USE ONLY. NOT FOR SALE FOR MARKETING OR ADVERTISING CAMPAIGNS.Mumbai: Pranav Dhanavade celebrates after creating a world record by scoring 1009 runs in an Under 16 MCA cricket match in Kalyan, in Mumbai on Tuesday. PTI Photo   (PTI1_5_2016_000158B)
हे वर्ष भारतीय क्रीडाजगतासाठी खूप चांगल गेलं.  प्रस्थापित खेळाडु जिथे झगडताना दिसले तिथे इतर खेळाडुंनी नव्याने आपली जागा मिळवली, आपली ओळख बनवली. पाहुयात देशातील यावर्षीच्या क्रीडाविषयक काही महत्त्वाच्या घटना.

1.विराट कोहली-विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना यावर्षी टीम इंडियाने एकही कसोटी सामना गमावला नाही. त्याने 12 सामन्यात 1251 धावा बनवल्या आहेत.कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो बॅट्समन म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे.

2.आर.अश्विन - यावर्षी त्याने 12 कसोटी सामन्यात 72 बळी घेतले. आयसीसीने नुकतंच त्याला प्लेअर ऑफ द ईअर म्हणून सन्मानित केलं. तसंच त्याला क्रिकेटर ऑफ द ईअर म्हणून सुद्धा गौरवण्यात आलंय. भारतीय संघ कसोटी प्रकारात पहिल्या क्रमांकावर आहे.

3.विजेंदर सिंग-यावर्षी त्याने 5 व्यावसायिक स्पर्धा जिंकल्या. तसंच कॅरी होपला हरवून तो डब्ल्युबीआ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पिअन बनला.

4.पी. व्ही. सिंधू-सिंधूने रियो ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन या खेळात देशासाठी सिल्वर मेडल जिंकलं. ही कामगिरी करणारी ती पहिली शटलर ठरली आहे.

5.साक्षी मलिक-साक्षीने रियो ऑलिंपिकमध्ये 58 किलो गटात ब्रॉन्झ मेडल जिंकलं. देशासाठी पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली.

6.दीपा करमाकर-दीपाची ऑलिंपिकसाठी जिमनॅस्ट म्हणून निवड होणं अभिमनाचं ठरलं.थोड्याश्या गुणांमुळे तिचे ब्रॉन्झ पदक हुकलं होतं. तिथपर्यंत पोहोचणारी ती पहिली जिम्नॅस्ट ठरली.

7.प्रणव धनावडे-वर्षाच्या सुरवातीलाच प्रणवने शालेय क्रिकेटमध्ये एका इंनिंगमध्ये 1009 धावा बनवून 117 वर्षांचा रेकॉर्ड मोडला.दरम्यान त्याने 59 षटकार आणि 127 चौकार लगावलं.

8.देवेंद्र झाझरिया-देवेंद्रने पॅराऑलिंपिकमध्ये देशासाठी सूवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धाप्रकारात हे त्याचे दुसरे पदक ठरले . तेथे 63.97 मी. भाला फेकुन वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

9.मारीयप्पन थांगावेल्लु - याने पॅराऑलिंपिकमध्ये उंच उडी स्पर्धेत टी-42 प्रकारात गोल्ड मेडल जिंकले.त्यांनी 1.89 मीटर उंची नोंदवली.

10.दीपा मलिक- याच स्पर्धेत दीपाने शॉट पूट या प्रकारात सिल्व्हर मेडल जिंकलं. हे पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.तिने 4.61 मीटर भाला फेकला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close