गडचिरोलीमध्ये गोदावरी नदीवरच्या पुलाचं उद्घाटन

December 30, 2016 9:30 AM0 commentsViews:

SIRONCHA UDGHATAN

30 डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचावासियांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे.महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून सतराशे किलोमीटरवर असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचं राज्यपाल विद्यासागरराव यांच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

गेल्या शंभर वर्षापासून या भागातल्या जनतेन बघितलेलं या पुलाचं स्वप्न पूर्ण झालंय.नदीच्या पलीकडे नेहमीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पाहणा-या सिरोंचावासियांना  यानिमित्ताने तब्बल 28 वर्षानंतर  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं दर्शन झालं.

माओवाद्यांच्या कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील भागात पहिल्यांदाच इतके मंत्री येत असल्याने या भागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. त्यामुळे या भागाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close