साखरपुड्याच्या चर्चेला विराटनं दिला पूर्णविराम

December 30, 2016 10:44 AM0 commentsViews:

virat_kohli_anushka_sharma_ge

30 डिसेंबर : ती रूपाची राणी आणि तो क्रिकेटचा राजा.आम्ही बोलतोय ते अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या जोडीबद्दल.ही जोडी कायम चर्चेत असते.आणि आता चर्चा होती ती या दोघांच्या साखरपुड्याची. पण आम्ही साखरपुडा करत नाहीय,असं ट्विट विराटनं करून या चर्चेला पूर्णविराम दिलाय.

सध्या हे दोघे उत्तराखंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतायत.आणि तिथेच 1 जानेवारीला त्यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा  होती. अगदी यासाठी सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन अशा व्हीआयपींना आमंत्रणही गेली असल्याची चर्चा होती.

‘मीडिया लोकांचा संभ्रम वाढवतंय,त्यामुळे आम्ही हा संभ्रम संपवतोय,’ असं ट्विट विराटनं केलंय.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close