4 लाख कोटींवर सरकारची ‘काळी’ नजर

December 30, 2016 11:12 AM0 commentsViews:

4 lakh koti nota

30डिसेंबर: नोटबंदीच्या निर्णयानंतर 1 लाखापेक्षा जास्त अकाऊंटमध्ये 4 लाख कोटी रूपये जमा झालेत आणि हा सगळा काळा पैसा असल्याचा संशय आयटी डिपार्टमेंटला आहे. पन्नास दिवसांपूर्वी ही रक्कम केवळ फक्त 80 लाख एवढी होती तीच आता 4 लाख कोटी रूपयावर पोहोचलीय.

हा सगळा पैसा टॅक्सचोरी करणाऱ्यांचा असल्याचा संशय करविभागाला आहे. ह्या सगळ्या माहितीची पडताळणी करून आतापर्यंत 5 हजार जणांना नोटीसही पाठवण्यात आल्यात. सरकारनं नोटबंदी जाहीर केल्यानंतर 60 लाख जणांनी जवळपास 7 लाख कोटी रूपये जमा केलेत. यातला बहुतांश पैसा हा पांढरा असेल अशी शक्यता वर्तवली जातेय.

सरकारनं काळा पैसा जाहीर करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यावर 50 टक्के टॅक्स भरून तो पांढरा करण्याची योजनाही सरकारकडून जाहीर केली गेलीय. लोनच्या परतव्यातही जवळपास जुन्या नोटांच्या स्वरूपात 50 हजार कोटी रूपये सरकार जमा झालेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close