‘बेक्स अॅण्ड केक्स’ बेकरीला आग, 6 कामगारांचा मृत्यू

December 30, 2016 11:00 AM0 commentsViews:

1

30 डिसेंबर: पुण्यातील कोंढव्यात बेक्स अॅण्ड केक्स या बेकरीला आज पहाटे लागलेल्या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. या बेकरीत काम करणारे 6 कामगार पोटमाळ्यावर झोपले होते. मात्र मालकाने बेकरीला बाहेरून कुलूप लावल्यामुळे आत गुदमरून त्यांची शुद्ध हरपली.

अथक प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढून ससून रूग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रूग्णालयात नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. बेकरीतल्या धुरात गुदमरून नंतर आगीत होरपळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय.

हे सर्व कामगार 25 ते 30 वयोगटातले होते. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकरीच्या मालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close